What is the psychology of "Hoax Callers"? (Marathi)


Hoax Caller परत परत का सुरक्षा यंत्रणाना call करतात ? मानसिकता काय असते ? जरूर वाचा आणि पहा etv bharat वर : डॉ निशिकांत विभुते यांचे मनोगत :
What is the psychology of "Hoax Callers"


Hoax Caller ची मानसिकता

Hoax call करणा-या व्यक्तीची काय मानसिकता असू शकते ह्यावर आपण आज विचार करुया. असे कॉल करण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

1) Inferiority Complex:

काही वेळा मी काहीतरी मोठे करुन दाखवले, मी सुरक्षा यंत्रणांना कसे कामाला लावले अशी विकृत मानसिकता पाहण्यात येते. आणि या मानसिकते मागे एक न्यूनगंड लपलेला असू शकतो. त्या व्यक्तीला आपल्या स्वतःबद्दल असणारा अभिमान (self-esteem) कमी असल्यामुले आपली काही किंमतच नाही अशी भावना असते.

2) Personal Gains:

काही वेळा अश्या व्यक्ती स्वतःला पकड़वून देऊन एक प्रसिद्धी मिळवू पाहतात . Attention प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे आपण कोणीतरी विशेष आहोत अशी भावना त्यांची निर्माण होते. Inflated self-esteem

कधी कधी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी देखील असे Hoax call केले जातात. जसे की विमानाला थांबवण्यासाठी आपल्या एखाद्या व्यक्तीला जाण्यासाठी उशीर होत असेल तर. पण अशा व्यक्तीमध्ये सामाजिक बांधिलकिची कमी असते.

What is Schizophrenia ? Explained in marathi.


3) Mental Disorders & addiction:

काही जण मानसिक विकाराने ग्रस्त असू शकतात, किंवा व्यसनाधीन असू शकतात. ज्याना मानसोपचार तज्ञांकडून योग्य त्या उपचाराची आवश्यकता असते. त्यांना असणा-या विकारामुळे ते खरे काय आणि काल्पनिक काय ह्या मध्ये फ़रक करू शकत नाहीत.

 

Conclusion (सारांश): जर तुम्हाला एखादा व्यक्ती मानसिक विकाराने ग्रस्त आहे किंवा नशेच्या आहारी जाऊन विचित्र वागत आहे, भासांच्या आधारावर फ़ोन करत आहे असे जाणवले तर तात्काळ त्या व्यक्तीला समुपदेशन अर्थात counselling किंवा मानसोपचार तज्ञांकड़े सल्ला घेण्यासाठी जरुर घेऊन जा. त्यामुळे त्या व्यक्तीच्या वागण्यामध्ये बदल होऊ शकतो आणि बरोबरच त्या व्यक्तिमुळे इतरांना होणा-या त्रासामधून सुद्धा सुटका होऊ शकते.

 

डॉ. निशिकांत विभुते हे मानसोपचार तज्ञ आहेत.

वरील लेख २४ जुलै २०२३ रोजी Etv Bharat या वृत्तवाहिनिवर प्रकाशीत झाला.

लिंक :- click here

 

 

 

 

 

 

 

 



 

Comments