1) भास होणे (Hallucination) :-
ऐकण्याचे भास (Hearing Voices) : आवाज ऐकू येणे.
स्वत:सी पुटपुटने (Muttering to self) : जणु काही समोर कोणी तरी आहे अशा प्रकारे बोलणे.
दिसणयाचे भास (Seeing Images) : चित्र विचित्र माणसे / छाया / भूते दिसतात असे वाटणे. जुने / मृत व्यक्ति भेटायला आले आहेत असे दिसणे.
2) वागण्यातील बदल :-
स्वभावामध्ये संशयी पणा येणे.
आपल्याबददल लोक बोलत आहेत.
आपल्याला बघून हसत आहेत.
आपल्या जेवणात कोणीतरी विष / काहीतरी टाकत आहेत.
दूसरा फ़ोन वर बोलत आसेल तर तो माझ्याबद्दल बोलत आहे.
सगळे एकत्र मिळून माझ्या विरुध्द पडयंत्र रचत आहेत.
कोणीतरी सतत आपल्यावर पाळत ठेवत आहे.
आपला पाठलाग होत आहे असे वाटणे.
आपल्या पती / पत्नीवर विनाकारण संशय करणे. त्याचे मोबाईल व ई-मेल परत परत चेक करत राहणे. ते ईतर कोणाशी बोलत असतील तर त्यांचा अर्थ प्रेमप्रकरण किंवा अनैतिक संबध असा लावणे.
आपल्यावर कोणीतरी काही जादू करतो आहे असे वाटणे.
आपल्या घरामध्ये काहीतरी अनुचित / अशुभ आहे असा समज होणे.
खिडक्या दरवाजे बंद करुनं ठेवणे.
घरातून बाहेर न निघणे.
देवसेनदिवस आंघोळ न करणे.
आपल्या शरीराचा किंवा मनाचा कोणीतरी ताबा होत आहे असे वाटणे.
आपल्या नातेवाईकाचे रूप घेऊन शत्रू आलेला आहे असे वाटणे.
3) विचार आणि नियोजनातील बदल :-
बोलताना एका वाक्याचा दूस-या वाक्याला संबंध न लागणे.
नियोजन न करता येणे.
पुढे चालून आपण जे आता करत आहोत त्याचा का्य परिणाम होइल याचा विचार न करणे.
आपण कामाला / शिकण्यासाठी गेलो पाहिजे ही भावना नाहीशी होणे.
4) सामाजिक असमंजसपणा :-
लोकांमध्ये कसे वागावे ह्याचे भान नसणे.
जिथे दु:खद घटना घडली आहे तेथे हसणे.
स्वत:च्या वैयक्तिक गोष्टी अनोलखी माणसाला सांगून टाकणे.
कपडे काढून टाकणे / भान न राहणे.
5) विचित्र लक्षणे :-
आरश्यासमोर उभे राहून हसत राहणे.
रस्त्यावर सतत फिरत राहणे.
जेवण खाताना विचित्रपणे खाणे.
कचरा / जुन्य वस्तु गोडा करुनं आणणे.
6) नकारात्मक लक्षणे :-
गरजेपेक्षा कमी बोलणे.
कोणत्याही क्रियेमध्ये उत्स्फुर्तपना नसणे.
हसण्यासारखा विनोद असेल तरीही शांतच राहणे.
दु:खद प्रसंग असेल तरीही दु:ख व्यक्त न करणे, न रडणे.
एखादी मोठी गोष्ट सांगायची असेल तरीही थोड्याश्याच शब्दांत व्यक्त करणे.
दूस-याने बोलवल्यावर लगेच प्रतिसाद न देणे.
Comments
Post a Comment