“ओ. सी. डी.”
OBSESSIVE COMPULSIVE DISORDER
कल्पना – क्रिया
अनिवार्यता विकार :
छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार (OCD)
ऑबसेसिव्ह –
कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) म्हणजे एक प्रकारचा चिंतेचा विकार असतो. याने बाधित
झालेल्या वयाक्तिच्या मनात नियंत्रण न ठेवता येण्याजोगे आणि नको ते विचार येऊ
लागतात. हे विचार परत परत येताच राहतात आणि त्या संबंधित क्रिया वारंवार करण्याची प्रबळ
ईच्छा मनात दाटून येते . हे विचार मानवाला बेचैन करून टाकतात . विचार काढन्याचा
प्रयत्न केला तरी विचार येतच राहतात .
उदाहरण १ :
विचार हाताला काही तरी घान लागलेली आहे असे वाटणे .जर
हात नाही धुतला तर काही तरी भयंकर इन्फेक्शन होइल अशी भीती वाटने .
उदाहरण २ :
विचार दरवाजा बरोबर बंद केला नाही असा मनात संशय येने
क्रिया : दरवाजाला कुलूप लावले आहे किंवा काय हे अनेक
वेळा पाहणे आणि
उदाहरण ३ :
विचार नको त्या वस्तू फेकून दिल्यात तर काहीतरी घडेल .
जुन्या वास्तु पुढे चालून उपयोगाला पडतील असा विचार .
क्रिया म्हणून
त्या वस्तु सांभाळून ठेवणे.
ओसीडी कशामुळे होतो
?
ओसीडीचे काही
विशिष्ट कारण नसले, तरी त्याची काही संभाव्य कारणे खाली दिलेली आहेत :
·
कौटुंबिक
पूर्वेतिहस.
·
मेंदूतील
रासायनिक असमतोल, जसे: सेरोटोनिनमुळे ओसीडी होऊ शकतो.
·
विशिष्ट
गुणसूत्रामध्ये किंवा जनुकांमध्ये बदल घडून येणे.
·
लहानपणी
झालेल्या लैंगिक शोषणासारख्या तणावपूर्व प्रसंगामुळे प्रौढ वयात ओसीडी होण्याची
शक्यता वाढते .
ओसीडीची लक्षणे कोणती आहेत ?
ओसीडीचा विकार
असलेल्या वयक्तींमध्ये साधारणपणे पुढील लक्षणे आढळून येतात :
·
इच्छा
नसतानाही मनात विचार किंवा चित्रे पुनः पुन्हा येणे. हे एखाध्या कशाविषयीही असू
शकतात; उदाहरणार्थ, आप्तजनांना त्रास होणे, अनधिकृतपणे घरात घुसणारयांविषयी भीती,
रोजगंतू किंवा घाण यांच्याविषयीची भीती, हिंसाचार किंवा लैंगिक क्रियांविषयी भीती.
·
एकच क्रिया
पुन: पुन्हा करणे. उदाहरणर्थ, हात धुणे, नको त्या वस्तू साठवून ठेवणे, गॅस बंद
केलेला आहे किंवा नाही हे पाहणे, किंवा पैसे मोजणे.
·
कृती
पुन्हा – पुन्हा केल्याने त्यांना आनंद होत नही, पण अनैच्छिक विचारांमुळे जी चिंता
निर्माण होते, त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो.
·
अशा
क्रिया पुन: पुन्हा करण्यासाठी प्रतिदिन किमान १ तास लागू शकतो, ज्यामुळे दैंनंदिन
जीवनावर परिणाम होतो.
गैरसमज
|
वस्तुस्थिती
|
ओसीडी हा विकार बहुधा स्त्रियांमध्येच आढळतो.
|
स्वच्छता आणि ओसीडी यांचा एकमेकांशी काहीही संबंध
नही, ओसीडी असलेल्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींविषयी आणि कृतींविषयी आकर्षण
असते आणि त्यांच्या विचारांना शांत करण्यासाठी त्यांना त्या कराव्या लागू शकतात.
|
ओसीडी असलेया व्यक्ति नेहमीच
नीटनेटक्या आणि स्वच्छ राहतात.
|
स्वच्छता आणि ओसीडी यांचा एकमेकांशी काहीही
संबंध नही, ओसीडी असलेल्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींविषयी आणि कृतींविषयी
आकर्षण असते आणि त्यांच्या विचारांना शांत करण्यासाठी त्यांना त्या कराव्या लागू
शकतात.
|
ओसीडी निदान मुलांमध्ये होत नही.
|
सर्वसाधारणपणे ६ – २५ वयाच्या व्यक्तिमध्ये ओसीडीचे
निदान होत असले, तरी ४ वर्षाच्या लहान मुलालाही ओसीडी होऊ शकतो. मुलांमध्ये
ओसीडी बऱ्याचदा वयाच्या ६ आणि १५ वर्षाच्या दरम्यान होतो, तर मुलींमध्ये तो
त्यांच्या वयाच्या विशीत होतो.
|
ओसीडीच्या स्थितीचे व्यवस्थापन करता येत नही.
|
ओसीडी व्यवस्थापन करता येते, संज्ञानी वर्तन
उपचारपध्दती (सीबीटी) आणि औषधोपचार यांच्या संयुक्त उपचाराने, वयक्तिच्या
दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करणारे अंतर्भेदी (इंटुजिव्ह) विचार कमी करुन
परिणामकारक सुधारणा दिसून येते.
|
मूलभूत लक्षाणांव्यतिरिक्त ओसीडीचे अन्य
दुष्परिणाम नसतात.
|
चिंता, औदासिन्य, थकवा, आत्महत्येचे विचार आणि
कृती यांसारखे ओसीडीचे दुष्परिणाम असतात. योग्य उपचार केल्यास ओसीडीचे
व्यवस्थापन करण्यास आणि त्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते.
|
Very nice information
ReplyDelete