Skip to main content

Posts

Showing posts with the label INTERNET ADDICTION

बी फॉर ब्लू व्हेल ...
ब्लू व्हेल राक्षस मासा ...

लहान असताना आम्ही ऐकायचो की पाश्चात्य देशात लोक excitement "काहीतरी भन्नाट करतोय" अशा भावाने आत्महत्या करतात . ऐकून बरच विचित्र आणि 'अशक्य कोटीतील गोष्ट' वाटायची.
 आज अशी वेळ समोर आलेली आहे की ह्या अशा अशक्य गोष्टी देखील आमच्या समोर भयंकर रूप धारण करून उभ्या राहत आहेत.

त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ब्लू व्हेल सुसाईड चॅलेंज " गेम. ह्या गेमच्या आहारी रशिया आणि अमेरिकेतील शेकडो मुलं बळी गेले आहेत. एखादा खेळ इतका घातक असेल असा विचार देखील आमच्या मनाला शिवला नव्हता. पण आपल्या भारतातील मुलं देखील ह्याला बळी पडू लागली तेव्हा आमची झोप खाडकन उडाली . अजूनही कोणी झोपेत असेल तर आत्ताच जागे होणे अत्यावश्यक आहे!!

आमच्या मुलांच्या रक्षणासाठी आम्हालाच कमर कसली पाहिजे .

 बऱ्याचवेळा अशा पद्धतीच्या थरारक बातम्या आपल्या समोर आल्यानंतर त्या गोष्टी आपल्यापासून खूपच दूर आहेत असे आपल्याला वाटते.पण खरे पाहता ह्या गोष्टी आपल्यापासून जास्त दूर नसतात आम्हालाही सतर्क राहण्याची तेवढीच आवश्यकता असते .
जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आपण विचार करतो :-
अशी घटना का घडत असेल?
 त्याचबरोबर असे खेळ मुलांपर…