ओब्सेसिव कमपल्सिव डिसऑर्डर / Obsessive Compulsive Disorder meaning explained in Marathi



“ओ. सी. डी.”
OBSESSIVE COMPULSIVE DISORDER

कल्पना – क्रिया अनिवार्यता विकार :
छंदिष्टपणा-अत्याग्रही विकार (OCD)

ocd marathi details






कल्पना – क्रिया अनिवार्यता विकार म्हणजे काय ?

ऑबसेसिव्ह – कंपल्सिव्ह डिसऑर्डर (ओसीडी) म्हणजे एक प्रकारचा चिंतेचा विकार असतो. याने बाधित झालेल्या वयाक्तिच्या मनात नियंत्रण न ठेवता येण्याजोगे आणि नको ते विचार येऊ लागतात. हे विचार परत परत येताच राहतात  आणि त्या संबंधित क्रिया वारंवार करण्याची प्रबळ ईच्छा मनात दाटून येते . हे विचार मानवाला बेचैन करून टाकतात . विचार काढन्याचा प्रयत्न केला तरी विचार येतच राहतात .
उदाहरण १ :
 विचार हाताला काही तरी घान लागलेली आहे असे वाटणे .जर हात नाही धुतला तर काही तरी भयंकर इन्फेक्शन होइल अशी भीती वाटने .
क्रिया हात स्वच्छ असण्याची खातरजमा करण्यासाठी हात पुनःपुन्हा धुणे,
उदाहरण २ :

विचार दरवाजा बरोबर बंद केला नाही असा मनात संशय येने

क्रिया : दरवाजाला कुलूप लावले आहे किंवा काय हे अनेक वेळा पाहणे आणि
उदाहरण ३ :
विचार नको त्या वस्तू फेकून दिल्यात तर काहीतरी घडेल . जुन्या वास्तु पुढे चालून उपयोगाला पडतील असा विचार .
क्रिया  म्हणून त्या वस्तु सांभाळून ठेवणे.


ओसीडी कशामुळे होतो ?

ओसीडीचे काही विशिष्ट कारण नसले, तरी त्याची काही संभाव्य कारणे खाली दिलेली आहेत :
·         कौटुंबिक पूर्वेतिहस.
·         मेंदूतील रासायनिक असमतोल, जसे: सेरोटोनिनमुळे ओसीडी होऊ शकतो.
·         विशिष्ट गुणसूत्रामध्ये किंवा जनुकांमध्ये बदल घडून येणे.
·         लहानपणी झालेल्या लैंगिक शोषणासारख्या तणावपूर्व प्रसंगामुळे प्रौढ वयात ओसीडी होण्याची शक्यता वाढते .

ओसीडीची लक्षणे कोणती आहेत ?

ओसीडीचा विकार असलेल्या वयक्तींमध्ये साधारणपणे पुढील लक्षणे आढळून येतात :
·         इच्छा नसतानाही मनात विचार किंवा चित्रे पुनः पुन्हा येणे. हे एखाध्या कशाविषयीही असू शकतात; उदाहरणार्थ, आप्तजनांना त्रास होणे, अनधिकृतपणे घरात घुसणारयांविषयी भीती, रोजगंतू किंवा घाण यांच्याविषयीची भीती, हिंसाचार किंवा लैंगिक क्रियांविषयी भीती.
·         एकच क्रिया पुन: पुन्हा करणे. उदाहरणर्थ, हात धुणे, नको त्या वस्तू साठवून ठेवणे, गॅस बंद केलेला आहे किंवा नाही हे पाहणे, किंवा पैसे मोजणे.
·         कृती पुन्हा – पुन्हा केल्याने त्यांना आनंद होत नही, पण अनैच्छिक विचारांमुळे जी चिंता निर्माण होते, त्यातून त्यांना दिलासा मिळू शकतो.
·         अशा क्रिया पुन: पुन्हा करण्यासाठी प्रतिदिन किमान १ तास लागू शकतो, ज्यामुळे दैंनंदिन जीवनावर परिणाम होतो.







गैरसमज

वस्तुस्थिती

ओसीडी हा विकार बहुधा स्त्रियांमध्येच आढळतो.

स्वच्छता आणि ओसीडी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नही, ओसीडी असलेल्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींविषयी आणि कृतींविषयी आकर्षण असते आणि त्यांच्या विचारांना शांत करण्यासाठी त्यांना त्या कराव्या लागू शकतात.


ओसीडी असलेया व्यक्ति नेहमीच
नीटनेटक्या आणि स्वच्छ राहतात.

स्वच्छता आणि ओसीडी यांचा एकमेकांशी काहीही संबंध नही, ओसीडी असलेल्या लोकांना काही विशिष्ट गोष्टींविषयी आणि कृतींविषयी आकर्षण असते आणि त्यांच्या विचारांना शांत करण्यासाठी त्यांना त्या कराव्या लागू शकतात.


ओसीडी निदान मुलांमध्ये होत नही.

सर्वसाधारणपणे ६ – २५ वयाच्या व्यक्तिमध्ये ओसीडीचे निदान होत असले, तरी ४ वर्षाच्या लहान मुलालाही ओसीडी होऊ शकतो. मुलांमध्ये ओसीडी बऱ्याचदा वयाच्या ६ आणि १५ वर्षाच्या दरम्यान होतो, तर मुलींमध्ये तो त्यांच्या वयाच्या विशीत होतो.


ओसीडीच्या स्थितीचे व्यवस्थापन करता येत नही.

ओसीडी व्यवस्थापन करता येते, संज्ञानी वर्तन उपचारपध्दती (सीबीटी) आणि औषधोपचार यांच्या संयुक्त उपचाराने, वयक्तिच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करणारे अंतर्भेदी (इंटुजिव्ह) विचार कमी करुन परिणामकारक सुधारणा दिसून येते.


मूलभूत लक्षाणांव्यतिरिक्त ओसीडीचे अन्य दुष्परिणाम नसतात.


चिंता, औदासिन्य, थकवा, आत्महत्येचे विचार आणि कृती यांसारखे ओसीडीचे दुष्परिणाम असतात. योग्य उपचार केल्यास ओसीडीचे व्यवस्थापन करण्यास आणि त्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते.


Comments

Post a Comment